Tata Elxsi शेअर 16% तर एका वर्षात 1150% वाढला | Tata Elxsi share news marathi Q3 Results

Tata Elxsi शेअर 16% तर एका वर्षात 1150% वाढला – Q3 Results Tata Elxsi share news marathi :

Tata Elxsi कंपनीचा शेअर 20 जानेवारी 2022 रोजी 8 टक्के वाढून 7525 रुपयांवर आला. (Tata Elxsi share news marathi) तर या दोन दिवसात शेअर 16 टक्क्यांपर्यंत वाढलेला पाहायला मिळाला.

सध्या टाटा एलेक्सी कंपनीचा शेअर 5 day, 20d, 50d, 100d, तर शेवटी 200day moving average च्यावर ट्रेड करत आहे. तर शेअरच्या technical analysis चार्टमध्ये जर आपण RSI पहिला तर तो 80 point वर आलेला बघायला मिळत आहे.

RSI 80 हा तर सध्या Overbought म्हणजेच शेअर विकण्याचे signal देत आहे. टाटा एलॅक्सी कंपनीचा शेअर मार्च 2020 मध्ये 650 रुपयांवर ट्रेड करत होता. तर सध्या तो 7500 रुपयांवर ट्रेड करत आहे म्हणजेच काय तर कंपनीचा शेअर 1150% एवढा जास्त वाढला आहे.

1. Tata Elxsi कंपनीचा बिझनेस :

टाटा एलेक्सी कंपनी डिझाईन आणि टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योगांना आणि कंपन्यांना पुरवण्याचे काम करते, त्यामध्ये transportation, Media, communication, हेल्थकेअर आणि मेडिकल सर्व्हिसेस यांचा समावेश होतो.

Tata Elxsi कंपनीची Q3 2022 या क्वार्टरमध्ये या सर्व विभागात लक्षणीय वाढ बघायला मिळाली आहे. Transportation बिझनेसमध्ये Qoq 9.7% तर Yoy 30.9% एवढी वाढ नोंदवली.

तसेच हेल्थकेअर business मध्ये कंपनीने Qoq 22% तर Yoy 73.4% एवढी मोठी वाढ नोंदवली आहे. त्यानंतर media आणि communication बिझनेसमध्ये Qoq 6.5% तर Yoy 31.1% एवढी वाढ नोंदवली आहे.

2. टाटा एलेक्सी Q3 Results कसे आले :

टाटा एलेक्सी कंपनीचे Q3 2022 म्हणजेच डिसेंबर 2021 या शेवटच्या क्वार्टरचे Results 18 जानेवारी 2022 रोजी कंपनीने जाहीर स्टॉक एक्सचेंजकडे जाहीर केले.

या Results मध्ये कंपनीने Net profit हा 151 करोड रुपये इतका जाहीर केला तर हा निव्वळ नफा मागच्या वर्षी 105 करोड रुपये इतका होता.

अशाप्रकारे tata Elxsi कंपनीच्या Net profit मध्ये 43.5% एवढी मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. प्रॉफिट वाढण्यामागचे कारण म्हणजे कंपनीच्या बिझनेसमध्ये होत असलेली growth आहे.

3. Tata Elxsi चा Q3 Revenue :

टाटा एलेक्सी कंपनीला डिसेंबर 2021 या शेवटच्या क्वार्टरमध्ये 635 करोड रुपये इतका Revenue झाला जो मागच्या वर्षीच्या क्वार्टरमध्ये 477 करोड रुपये इतका होता.

अशाप्रकारे कंपनीचा Revenue हा Yoy 33.2 टक्क्यांनी वाढला आहे तर Qoq कंपनीचा Revenue हा 6.7 टक्क्यांनी वाढलेला पाहायला मिळत आहे. (Tata Elxsi share news marathi)

4. टाटा एलेक्सी EBIDTA :

टाटा एलेक्सी कंपनीचा EBIDTA म्हणजेच Earning before interest, depreciation, tax & amortisation हा Qoq 14.8 टक्क्यांनी तर Yoy 46.8 टक्क्यांनी वाढून 210 करोड रुपये इतका झालेला बघायला मिळाला.

कंपनीच्या Yoy EBITDA मध्ये 46.8 टक्के एवढी मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

5. Tata Elxsi Q3 2022 संपूर्ण रिझल्ट्स :

In Cr (करोड) Dec-2021 Dec-2020
महसूल (Revenue) 635 477
खर्च (Expenditure) -427 -334
PBT 200 146
कर (Tax) -49 -41
निव्वळ नफा (Net profit) 151 105
EPS (Rs) 24 16.8

6. Tata Elxsi Dividend 2022 :

Tata Elxsi कंपनीने शेवटचा डिविडेंड हा 2021 साली 24 रुपये Special आणि 24 रुपये Final प्रति शेअर म्हणजेच 48 रुपये इतका दिला होता. यावर्षीच्या Quarterly 2022 च्या निकालात टाटा एलॅक्सि कंपनीने आणखी कोणताही लाभांश जाहीर केलेला नाही.

शेअर बाजारातील लोकांचा दृष्टीकोन असतो कि Dividend दिला म्हणजे कंपनी चांगली आहे. परंतु असे न असता कंपनी त्या पैश्यांचा उपयोग उद्योग वाढीसाठी करत असते. अशाप्रकारे आपल्याला तो डिविडेंड शेअर price वाढीच्या रूपात दिसून येत असतो. (Tata Elxsi share news marathi)

7. Brokerage चे मत – Rating, Buy or Sell, Target price : 

Brokerage Firm Rating Target Price
KR Choksey Accumulate 7504 रु 
Sharekhan BUY 8160 रु 
IIFL BUY 5850 रु 

—-   धन्यवाद  —-

शेअर बाजार बातम्या ह्या शेअर मार्केटमधील प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाच्या असतात हे नक्कीच शाश्वत सत्य आहे. जर तुम्हाला हि Tata Elxsi share news marathi News आणि माहिती आवडली तर नक्की संकेत द्या आणि comment करा… ज्याच्यामुळे आम्हाला नक्कीच Motivation मिळेल. 

धन्यवाद
कृपया आपला अनुभव शेअर करा

Leave a Comment