बोनस शेअर म्हणजे काय? | what is the Bonus share marathi meaning 5 min big info

आज आपण बोनस शेअर म्हणजे काय? (what is the Bonus share marathi meaning) याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. 

बोनस शेअर कॅल्क्युलेशन कसे करतात, what is the bonus share, कंपनी बोनस शेअर का देते, बोनस शेअरसंबंधी महत्त्वाच्या तारखा, बोनस जाहीर करणार्या कंपन्याची यादीयादी कशी पहायची.

बोनस शेअरमुळे होणारे फायदे, बोनस शेअरचा शेअरवरती Effect, या सर्व गोष्टी आपण सविस्तररित्या आपल्या मायबोली मराठी भाषेत समजून घेणार आहोत.  

बोनस शेअर म्हणजे काय? – what is the Bonus share marathi meaning

जर तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअरहोल्डर आहात आणि जर कंपनीने तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मालकीच्या शेअरवरती काही शेअर मोफत दिले तर त्या शेअर्सला बोनस शेअर म्हणतात. 

उदाहरणार्थ:- जर तुमच्याकडे रिलायन्स या कंपनीचे १०० शेअर्स आहेत आणि कंपनीने तुम्हाला १:१ या अनुपातामध्ये बोनस शेअर जाहीर केले, म्हणजे कंपनीने तुम्हाला तुमच्या १०० शेअरवरती १०० बोनस शेअर मोफत दिले. तर तुमच्याकडे आता बोनस शेअर मिळुन एकुण २०० शेअर होतील. 

बोनस शेअर देण्याचा निर्णय हा सर्वस्वी कंपनीचा असतो, काही ठराविक कंपन्या काही ठराविक उद्देशाने बोनस शेअर जाहीर करतात ते आपण खाली सविस्तररित्या पाहणार आहोतच. (Bonus share marathi meaning)

बोनस शेअर कॅल्क्युलेशन :

जेव्हा कंपनी बोनस शेअर जाहीर करते तेव्हा कंपनी एका विशिष्ट पद्धतीने गुणोत्तराच्या रुपात त्यांची संख्या दर्शवते, याची काही ठराविक उदाहरणे आणि अर्थ आपण आता समजून घेऊयात. 

१:१ म्हणजे तुमच्या १ शेअरवरती १ बोनस शेअर

२:१ म्हणजे तुमच्या १ शेअरवरती २ बोनस शेअर

अशाप्रकारे कंपनी एका शेअरवरती ५ बोनस शेअर पर्यंत देऊ शकते, परंतु हा निर्णय सर्वस्वी कंपनीचा असतो. 

उदाहरणार्थ:- 

बोनस शेअर कॅल्क्युलेशन

वरील चित्रामध्ये आपण २०२१ या वर्षातील काही महिन्यांत कंपनीने जाहीर केलेल्या बोनस शेअरची यादी आपण पाहू शकतो. यामध्ये दाखवलेले काही कंपन्यांचे बोनस शेअरचे गुणोत्तरे आपण समजून घेऊयात.  (Bonus share marathi meaning)

१:१० म्हणजे तुमच्या १० शेअरवरती १ बोनस शेअर

२:७ म्हणजे तुमच्या ७ शेअरवरती २ बोनस शेअर

१:४ म्हणजे तुमच्या ४ शेअरवरती १ बोनस शेअर

४:१ म्हणजे तुमच्या १ शेअरवरती ४ बोनस शेअर

३:२० म्हणजे तुमच्या २० शेअरवरती ३ बोनस शेअर

२७:१० म्हणजे तुमच्या १० शेअरवरती २७ बोनस शेअर

५:४ म्हणजे तुमच्या ४ शेअरवरती ५ बोनस शेअर

५९:१०० म्हणजे तुमच्या १०० शेअरवरती ५९ बोनस शेअर

या सर्व उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला आता बोनस शेअरच्या कॅल्क्युलेशन आणि त्याच्या गुणोत्तराबद्दल परीपूर्ण माहिती नक्कीच मिळाली असेल. 

बोनस शेअरचा शेअरवरती Effect :

कंपनी ज्यावेळी बोनस शेअर देते त्यावेळेस कंपनीच्या शेअर बाजारातील किंमतीत तेवढ्याच गुणोत्तर प्रमाणात उतरंडी पहायला मिळते. म्हणजे कंपनीने १:१ इतका बोनस दिला तर शेअरची किंमत त्यादिवशी आर्धी झालेली पहायला मिळते. 

त्याचप्रमाणे जर का कंपनीची मार्केट प्राइस हि ९० रुपये असेल आणि कंपनीने ३:१ असा बोनस जाहीर केला तर त्यानंतर शेअरची किंमत हि ३:१ इतकी कमी होऊन ती ३० रुपयावरती येईल. म्हणजे त्यादिवशी जरी तुमच्या शेअरच्या संख्येत वाढ झाली असेल तरी तुमच्या कॅपिटलमध्ये कोणतीही वाढ तुम्हाला लगेचच दिसणार नाही. 

परंतु जेव्हा बोनस शेअर जाहीर केले जातात त्यामुळी शेअर बाजारात हि positive centiment समजली जाते आणि demand मध्ये वाढ झाल्याने हळूहळू शेअरच्या किंमतीतही आपल्याला वाढ पहायला मिळते. (Bonus share marathi meaning)

कंपनी बोनस शेअर का देते :

शेअरच्या किंमतीत घट :

ज्यावेळेस कंपनीला असे वाटते की आपल्या शेअरची किंमत सध्या बाजारात जास्त वाटत आहे, अशावेळेस कंपनी साधारण ग्राहकांना आपल्या कंपनीचा शेअर खरेदी करता यावा म्हणून, हे एक मुख्य कारण आहे. 

लिक्विडीटीमध्ये वाढ :

बोनस शेअर जारी केल्याने कंपनीच्या शेअर संख्येत वाढ होते तसेच शेअरची किंमत कमी झाल्याने शेअरमध्ये चांगली लिक्विडीटी निर्माण होते. म्हणजेच शेअरच्या चालू किंमतीला चांगले खरेदीदार आणि विक्री करणारे मिळतात. 

स्पेकुलेशनला आळा :

शेअर मार्केटमध्ये लिक्विडीटी वाढल्याने शेअरमध्ये सामान्य लोकांपासून ते मोठ्या संस्थापर्यंत सर्वांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढलेला पहायला मिळतो, त्यामुळे कोणी एखादी व्यक्ती किंवा संस्था शेअरसोबत स्पेकुलेशन म्हणजे शेअरला स्वतः वर किंवा खाली घेऊन जाऊ शकत नाही. 

बोनस शेअरसंबंधी महत्त्वाच्या तारखा :

Bonus share announcement / declaration date in marathi:-

ज्या दिवशी कंपनीचे Board of directors त्यांच्या वार्षिक किंवा तिमासिक बैठकीत बोनस शेअर देण्याचे जाहीर करतात ती बोनस शेअर अनाउन्समेंट किंवा डिक्लेअरेशन तारिख असते. 

Ex. Dividend date / Last cum dividend date in marathi:-

हि एक महत्त्वाची तारिख आहे, कारण जर या तारखेनंतर तुम्ही शेअर खरेदी केला तर तुम्हाला बोनस शेअर मिळत नाही किंवा या तारखेनंतर तुमचे नाव बोनस शेअर मिळणार्यांच्या यादीत नोंदले जात नाही. 

कारण जर का आपण एखादा शेअर खरेदी केला तर तो शेअर तुमच्या नावावरती होण्यासाठी T + 2 days , म्हणजेच शेअर खरेदी केलेला दिवस सोडून तुम्हाला आणखी दोन दिवस लागतात. 

Record date in marathi :-

या दिवशी कंपनी बोनस शेअर्स दिल्या जाणार्या सर्व शेअरहोल्डर्सची यादी जाहीर करते. या दिवशी ज्या ज्या व्यक्तींकडे शेअर आहेत, म्हणजेच तीन दिवसांपूर्वीपासून ज्या व्यक्तीकडे हा शेअर आहे त्यांचे नाव या दिवशी यादीमध्ये नोंदले जाते. 

वरती आपण पाहिल्याप्रमाणे जर तुम्ही या दिवशी, एक दिवस अगोदर किंवा दोन दिवस अगोदर जर शेअर खरेदी केला तर तो शेअर तुमच्या नावावरतीच होणार नाही कारण त्यासाठी T + 2 days लागतात. (Bonus share marathi meaning)

बोनस शेअरमुळे होणारे फायदे :

शेअरच्या संख्येत वाढ:

ज्यावेळेस कंपनी बोनस शेअर जारी करते, तेव्हा समजा १:१ बोनस शेअर दिले तर तुमच्या असलेल्या शेअर संख्येत दुप्पटीने वाढ पहायला मिळते. याचा फायदा तुम्हाला भविष्यात होणाऱ्या शेअर प्राइस वाढीमध्ये पहायला मिळतो. 

डिविडंडमध्ये फायदा :

बोनस शेअरमुळे तुमच्या शेअर संख्येत वाढ होते, आणि त्यामुळे तुम्हाला जो प्रति शेअर मिळणारा डिविडंड असतो तो नक्कीच त्याप्रमाणात वाढतो. 

टॅक्सेसमध्ये फायदा :

तुम्हाला मिळालेल्या बोनस शेअरवरती तुम्हाला टॅक्स लागत नाही, परंतु त्यासाठी दोन नियम लागू होतात. 

१. पहिला – बोनस शेअर मिळालेल्या तारखेपासून तर तो विकण्याचा तारखेपर्यंत जर एक वर्षापेक्षा कमी कालावधी झाला असेल, तर तो ट्रेड शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असा समजला जाऊन, त्यावरती तुम्हाला १५% टॅक्स लागतो. 

२. दुसरा नियम – बोनस शेअर मिळालेल्या तारखेपासून तर तो विकण्याचा तारखेपर्यंत जर एक वर्षाचा कालावधी होऊन गेला असेल, तर तो ट्रेड लॉंग टर्म कॅपिटल गेन असा समजला जाऊन, त्यावरती तुम्हाला टॅक्स लागत नाही म्हणजे शुन्य रुपये टॅक्स लागतो. 

बोनस जाहीर करणार्या कंपन्याची यादी :

खाली आपण दोन प्रकारात बोनस शेअर देणार्या कंपन्या पाहणार आहोत. 

१. Upcoming – काही दिवसांनी बोनस शेअर देणार्या कंपन्या :

खाली दिलेल्या लिंकवरती तुम्ही भविष्यात किंवा काही दिवसांनी बोनस शेअर देणार्या कंपन्यांची यादी पाहु शकता, जेणेकरून तुम्ही त्या शेअरचा सखोल अभ्यास करू शकता. 

moneyconyrol – Upcoming बोनस शेअर देणार्या कंपन्या

२. History – आतापर्यंत बोनस शेअर दिलेल्या कंपन्या :

खाली दिलेल्या लिंकवरती तुम्ही भुतकाळात किंवा काही दिवसांपूर्वी ज्या कंपन्यांची बोनस शेअर्स दिले आहेत त्यांची यादी पाहु शकता, जेणेकरून तुम्ही त्या शेअरचा सखोल अभ्यास करू शकता. 

moneyconyrol – आतापर्यंत बोनस शेअर दिलेल्या कंपन्या

Conclusion – बोनस शेअर म्हणजे काय? (Bonus share marathi meaning) 

थोडक्यात बोनस शेअर म्हणजे (what is the bonus share marathi meaning) जर तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअरहोल्डर आहात आणि जर कंपनीने तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मालकीच्या शेअरवरती काही शेअर मोफत दिले तर त्या शेअर्सला बोनस शेअर म्हणतात. 

अशाप्रकारे आपण बोनस शेअरविषयी सखोल अभ्यास केला आहे, तसेच त्याबद्दलचे छोटे छोटे बारकावेसुध्दा आपण सविस्तररित्या समजून घेतले आहेत. शेवटी आपला निष्कर्ष हाच निघतो की, बोनस शेअर्स हे आपल्याला करोडपती लोकांमध्ये नेऊन बसवण्यात नेहमी आणि नक्कीच पुढे सरसावतील.  

FAQ – बोनस शेअर

बोनस शेअर म्हणजे काय?

बोनस शेअर म्हणजे जर तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअरहोल्डर आहात आणि जर कंपनीने तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मालकीच्या शेअरवरती काही शेअर मोफत दिले तर त्या शेअर्सला बोनस शेअर म्हणतात. 

कोणत्या कंपन्या बोनस शेअर देऊ शकतात? 

ज्या कंपन्याचा नेट प्रॉफिट हा बर्यापैकी उत्तम आहे, आणि बोनस शेअर देण्यासाठी कंपनीकडे पुरेसा reserve fund आहे त्याच कंपन्या या रिझर्व्ह फंडचा उपयोग करून बोनस शेअर देऊ शकतात. 

बोनस शेअर २:१ , १०:५० गुणोत्तर म्हणजे काय? 

२:१ बोनस शेअर म्हणजे तुमच्याकडे असलेल्या १ शेअरवरती २ बोनस शेअर मोफत. तसेच १०:५० बोनस शेअर म्हणजे तुमच्याकडे असलेल्या ५० शेअरवरती १० बोनस शेअर मोफत.

—-   धन्यवाद  —-

शेअर मार्केट अभ्यास या विषयात माझी आणि मार्केटसागर.com ची हि important post आहे, जर तुम्हाला आवडली तर नक्की संकेत द्या… 

धन्यवाद
कृपया आपला अनुभव शेअर करा

Leave a Comment