ट्रेडिंग म्हणजे काय? | Trading meaning in marathi 5 min big information

Trading या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ म्हणजे व्यापार तसेच व्यवसाय, धंदा, खरेदी विक्री, व्यवहार हा होय. (Trading meaning in marathi) ट्रेडिंग म्हणजे काय तर तुमच्याकडे असलेले पैसे किंवा वस्तू देऊन त्याच्याबदली तुम्हाला हवी असलेली दुसरी वस्तू घेणे होय. 

पुर्वीच्या काळात ज्यावेळेस पैसा किंवा कोणतेही चलन नव्हते त्यामुळी लोक आपल्या शेतात पिकलेली गहू ज्वारी देऊन किराणा दुकानातून साखर चहापत्ती आणायचे हिच ती ट्रेडिंग जी माणसाने माणसासाठी आणि त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण केली. 

परंतु हि जुनी पद्धती होती ती लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी होती, परंतु आजच्या २१ व्या शतकात या online च्या जगात Trading या शब्दाचा अर्थच बदलला आहे. ट्रेडिंग (Trading meaning in marathi) हा शब्द आता पुर्णपणे शेअर मार्केटचा झालेला आहे. 

तर आपण आज आपल्या मार्केटसागर या ब्लॉगमध्ये शेअर बाजारातील ट्रेडिंग या शब्दाच्या अर्थापासुन त्याचे विविध प्रकार, उत्तम प्रकारे ट्रेडिंग कशी करावी, आणि ट्रेडिंगबद्दलचे संपूर्ण बारकावे शिकणार आणि समजून घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला शेअर बाजारातील तज्ञ होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. (Trading meaning in marathi)

ट्रेडिंग म्हणजे काय? – Trading meaning in marathi

शेअर बाजारात शेअर कमी किंमतीत खरेदी करून काही कालावधीनंतर जास्त किंमतीत विकणे आणि त्यापासून नफा कमविने म्हणजेच ट्रेडिंग होय. 

शेअर बाजारात ट्रेडिंगमुळे तुम्हाला मोठा नफा मिळु शकतो तसेच तुम्ही invest केलेली तुमची कॅपिटल रक्कमसुध्दा जवळजवळ संपुष्टात येऊ शकते. 

त्यामुळे ट्रेडिंग म्हणजे काय आणि ट्रेडिंग कशी करावी याबद्दल जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण हेच आहे शेअर बाजारात पैसे कमवण्याचे सर्वात मोठे रहस्य.

शेअर बाजारात शेअर खरेदी केल्यानंतर तो शेअर तो शेअर दिवस होल्ड करता तो कालावधी तुमच्या ट्रेडिंगचा (trading in marathi) प्रकार ठरवतो आणि तोच कालावधी तुमची गुंतवणूक द्विगुणित करण्यास कारणीभूत ठरतो. (Trading meaning in marathi)

१. ट्रेडिंगचे प्रकार – Types of trading in marathi

वरती आपण पाहिले त्याप्रमाणे तुम्ही खरेदी केलेला शेअर तुम्ही जेवढ्या कालावधीसाठी तुम्ही शेअर होल्ड करता त्या कालावधीनुसार ट्रेडिंगचे पुढील महत्त्वाचे प्रकार पडतात:-

१. इंट्रा डे ट्रेडिंग – Intra day trading 

२. स्विंग ट्रेडिंग – Swing trading

३. स्काल्पर ट्रेडिंग – Scalper trading

४. पोजीशनल ट्रेडिंग – Positional trading

५. लॉंग टर्म ट्रेडिंग – Long term trading

हे आहेत काही महत्त्वाचे ट्रेडिंगचे प्रकार, ज्याबद्दल आपण आता सविस्तररित्या माहिती घेणार आहोत. 

१. इंट्रा डे ट्रेडिंग – Intra day trading 

इंट्रा डे ट्रेडिंग या प्रकारात तुम्ही खरेदी केलेला शेअर तुम्ही त्याच दिवशी शेअर बाजाराचा ट्रेडिंग टाईम पुर्ण होण्याच्या अगोदर म्हणजेच दुपारच्या ३:३० वाजण्याच्या अगोदर केव्हाही शेअर विकुन त्यापासून नफा कमावता. 

या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये मोठेमोठे ट्रेडर्स सामिल असतात जे त्यांच्या पैश्याच्या जोरावरती शेअरला वर घेऊन जाण्याचे तसेच हवे असल्यास शेअरला खाली आणण्याचे काम करत असतात. त्यामुळे सर्वसाधारण निवेशकासाठी हि ट्रेडिंग धोकादायक ठरू शकते. (Trading meaning in marathi)

इंट्रा डे ट्रेडिंग कशी करावी आणि इंट्रा डे बद्दल सर्व काही…

२. स्विंग ट्रेडिंग – Swing trading

स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्ही खरेदी केलेला शेअर हा काही दिवसांसाठी किंवा काही आठवड्यांसाठी होल्ड केला जातो आणि त्यानंतर चांगला नफा मिळाल्यानंतर तो विकला जातो. 

या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये तुम्हाला तुमच्या शेअरची वाटचाल किंवा शेअरच्या किंमतीतील चढ उतार कशी चालू आहे याचा नियमित अभ्यास करणे खुप महत्त्वाचे आहे. त्यानुसारच तुम्हाला शेअर कधी विकावा आणि त्यापासून चांगला नफा कसा मिळवावा याबद्दल चांगला अंदाज लावता येईल. 

स्विंग ट्रेडिंग कशी करावी आणि स्विंग ट्रेडिंग बद्दल सर्व काही…

३. स्काल्पर ट्रेडिंग – Scalper trading :

स्काल्पर ट्रेडिंगमध्ये शेअर खरेदी केल्यानंतर तो शेअर लगेचच काही मिनिटांमध्येच विकला जातो, हा कालावधी १, २, किंवा ५ मिनिटे असतो. आणि नफा मिळाला की तो शेअर विकला जातो परंतु या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये केल्या गेलेल्या ट्रेडची रक्कम हि खुप मोठी असते. 

स्काल्पर ट्रेडिंगमध्ये सहसा मोठेमोठे ट्रेडर्स समाविष्ट असतात जे विशिष्ट प्रकारच्या ट्रेडिंग सॉफ्टवेअरचा उपयोग करून मोठा नफा कमावता असतात. 

सर्वसाधारण निवेशकांनी स्काल्पर ट्रेडिंगपासून दुर राहणेच फायद्याचे ठरेल. (Trading meaning in marathi)

४. पोजीशनल ट्रेडिंग – Positional trading :

पोजीशनल ट्रेडिंगमध्ये खरेदी केलेला शेअर हा काही दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत परंतु जास्तीत जास्त एका वर्षाच्या आत तो शेअर विकला गेला पाहिजे. 

पोजीशनल ट्रेडिंग म्हणजे साध्या भाषेत योग्य वेळ पाहुन शेअरमध्ये पोजीशन घेणे आणि योग्य वेळ पाहुन परंतु एका वर्षाच्या आत तो शेअर विकुन त्यापासून नफा कमावने होय.  

या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये सर्वसाधारण निवेशक निवेश करु शकतो परंतु त्या शेअरच्या कंपनीबद्दल त्यांच्या उद्योगाबद्दल आणि त्याच्या चार्ट पॅटर्नचा अभ्यास करणे खुप महत्त्वाचे आहे. 

५. लॉंग टर्म ट्रेडिंग – Long term trading

लॉंग टर्म ट्रेडिंग म्हणजे तुम्ही शेअर खरेदी केल्यानंतर तो शेअर एका वर्षापेक्षा जास्त आणि जवळजवळ चार ते पाच वर्षासाठी होल्ड करणे आणि त्या शेअरपासुन आणि कंपनीच्या ग्रोथच्या माध्यमातून संपूर्ण नफा मिळवने होय. 

लॉंग टर्म ट्रेडिंगमुळे तुम्हाला Power of compounding चा खरा अर्थ समजेल. या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये तुम्हाला कंपनीचा डिविडंड, कंपनीने जर जाहीर केले तर बोनस शेअर, तसेच कंपनीच्या शेअरच्या किंमतीतील झालेली काही पटीने वाढ अशाप्रकारे तिहेरी नफा मिळतो. 

सर्वसाधारण लोकांनी लॉंग टर्म ट्रेडिंगच करावी परंतु हि ट्रेडिंग व्यवस्थित अभ्यास करून आणि सेक्टरमध्ये लीडर असलेल्या कंपन्यामध्येच करावी. नाहीतर मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

२. प्रॅक्टिकली ट्रेडिंग कशी करावी -Share Trading marathi practically :

ट्रेडिंग करणे म्हणजे शेअर खरेदी करणे आणि योग्यवेळी नफा कमावुन शेअर विकणे होय. ट्रेडिंग करण्यासाठी (share trading marathi) तुम्हाला पुढील काही गोष्टींची आवश्यकता आहे :

१. बॅंक खाते

२. बॅंक खात्यात मुबलक पैसा 

३. डिमॅट अकाउंट

बँक खात्यातुन तुम्हाला तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये पैसे टाकावे लागतात जेणेकरून तुम्ही त्या पैश्यांचा उपयोग करून शेअर खरेदी करू शकता. चला तर मग जाणुन घेऊयात ट्रेडिंग करण्याबद्दल सविस्तररित्या. 

१. Demat Account कसे उघडायचे : 

तर खाली दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्ही Zerodha या broker कडे Demat Account उघडु शकता, याठिकाणी तुम्ही लवकर Demat Account उघडु शकाल आणि लवकरच trading चालु करू शकता. माझ्याकडेही Zerodha चेच trading account आहे, वापरासाठी सोयीस्कर आणि पैसे वाचवणारे आहे. 

खाली दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्ही Zerodha या broker कडे Demat Account उघडु शकता
 
२. Share कसा खरेदी करायचा :

Demat Account उघडल्यानंतर तुम्हाला Zerodha Kite या app वरती किंवा पानावरती  खालील interface पहायला मिळेल. ज्यामध्ये तुम्हाला तुमचे आवडते शेअर add करता येतील.

Zerodha Kite Share कसा खरेदी करायचा step 1

जर तुम्हाला वरील चित्राप्रमाणे Reliance  हा शेअर buy करायचा असेल तर त्यावर click केल्यास खालील चित्रातील इंटरफेस उघडेल. मग तुम्ही त्याप्रमाणे तुम्हाला हव्या त्या किंमतीला, हवे तेवढे शेअरची bid लावु शकता. 

Zerodha Kite Share कसा खरेदी करायचा step 2

 

Zerodha मध्ये शेअर खरेदी करण्यासाठी जेव्हा तुम्ही Buy या बटनवरती क्लीक केल्यानंतर समोरील इंटरफेस आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये तुम्हाला Quantity म्हणजे खरेदी करायच्या असलेल्या शेअरची संख्या टाकावी लागते. 

त्यानंतर Price म्हणजे तुम्हाला कोणत्या किंमतीला शेअर खरेदी करायचा आहे ती किंमत टाकावी. त्यानंतर CNC म्हणजे तुम्हाला डिलिव्हरीसाठी शेअर खरेदी करायचा आहे आणि MIS म्हणजे तुम्हाला इंट्रा डे साठी शेअर खरेदी करायचा आहे, तर हवा असलेला ओपशन निवडावा.

CNC या ओपशनमध्ये तुम्ही इंट्रा डे ट्रेडसुद्धा करू शकता, परंतु MIS मध्ये त्याच दिवशी तुम्हाला तो शेअर विकावा लागतो नाहीतर पेनल्टी लागते. 

Zerodha Kite Share कसा खरेदी करायचा step 3

त्यानंतर Order मध्ये Limit निवडावे म्हणजे तुम्हाला हव्या असलेल्या शेअरची किंमत टाकता येते. Market या पर्यायामध्ये ज्या किंमतीला विक्रेता शेअर विकत आहे त्याच किंमतीला शेअर मिळतो. त्यानंतर शेवटी SWIPE TO BUY या बटनवरती तुम्ही क्लिक केले म्हणजे तुमची ऑर्डर प्लेस होते. 

अशाप्रकारे तुम्हाला विक्रेता मिळाला म्हणजे तुमची ऑर्डर पुर्ण होऊन शेअर तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये जमा होतात. अशाप्रकारे तुमचा ट्रेड पुर्ण झालेला आहे किंवा हि आपली एक शेअर खरेदी करण्याची ट्रेडिंग (what is trading in marathi) प्रॅक्टिकली पूर्ण झाली. 

३. ट्रेडिंगसंबंधी महत्त्वाच्या संज्ञा – Important terms of What is trading in marathi :

कोणत्या प्रकारच्या ट्रेडिंगचा अवलंब करावा तसेच कोणत्या ट्रेडिंगचा उपयोग केल्याने आपल्याला मोठा नफा तसेच तोटा होऊ शकतो या सर्व गोष्टी समजण्यासाठी आपण समोरील काही महत्त्वाच्या संज्ञांचा अभ्यास करणार आहोत. 

१. निवेशक – Investor :

Investor म्हणजे असा व्यक्ती कि जो शेअर खरेदी करतो तो लॉंग टर्मचा विचार करून आणि जेव्हा त्याला त्या कंपनीवरती संपूर्ण विश्वास असतो कि कंपनी नक्कीच ग्रोथ करेल. 

निवेशक हा असा व्यक्ती असतो ज्याला समाजात ओळख असते, जसे कि राकेश झुनझुनवाला, वारेन बफे. या अशा व्यक्ती आहेत ज्यांना Quality शेअरच्या भरवशावरती शुन्यातून संपत्ती उभारली. 

निवेशक हे कंपनीच्या बॅलन्स शीटचा तसेच फंडामेंटल ॲनालिसीसचा अभ्यास करून शेअर खरेदी किंवा विक्री करण्याचा निर्णय घेतात. 

२. ट्रेडर – Trader :

ट्रेडर हे अशे व्यक्तीमत्व आहे जे फक्त मार्केटमधील समुद्राच्या लाटेचा तसेच आलेल्या त्सुनामीचादेखील पैसा कमवण्यासाठी उपयोग करत असतात. 

ट्रेडर हे मार्केटमधील पॉजीटिव्ह न्युजचा उपयोग करून पैसा कमावतात तसेच निगेटिव्ह न्युज असेल शॉर्ट सेलिंग करूनदेखील नफा कमावत असतात. त्यांच्यासाठी कंपनी कशी आहे किंवा कंपनीचा उद्योग कसा चालत आहे हे तेवढेशे महत्त्वाचे नसते. 

ट्रेडर हे सहसा शॉर्ट टर्म ट्रेडिंगचा किंवा इंट्रा डे ट्रेडिंगचाच वापर करतात. ट्रेडर हे विशिष्ट प्रकारच्या ट्रेडिंग सॉफ्टवेअरचा उपयोग करतात तसेच टेक्निकल ॲनालिसीसचा उपयोग करून शेअर खरेदी किंवा विक्री करण्याचा निर्णय घेतात. 

३. शेअर खरेदीची वेळ – Time of trade :

शेअर खरेदीची वेळ किंवा शेअरमध्ये कधी Entry करावी हा एक खुप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण योग्यवेळी जर का तुम्ही शेअर खरेदी केला तसेच चुकीच्यावेळी शेअर खरेदी केला तर तुम्हाला चांगला नफा तसेच तोटाही  होऊ शकतो. 

शेअर कधी खरेदी करावा यासाठी तुम्ही फंडामेंटल तसेच टेक्निकल इंडीकेटर्सचा अभ्यास केला पाहिजे. 

फंडामेंटल इंडीकेटर्समध्ये पीबी रेशो, पीई रेशो, रिटर्न ऑन इक्विटी, ५२ आठवड्यातील शेअरची पोजीशन या महत्त्वाच्या इंडीकेटरचा अभ्यास करने महत्त्वाचे आहे, आणि त्याप्रमाणे योग्य वेळ पाहुन शेअर खरेदी केला पाहिजे. 

तसेच टेक्निकल इंडीकेटर्समध्ये आरयसआय (RSI) इंडीकेटर, MACD इंडीकेटर, PRINGS KST इंडीकेटर, On Bal Volume इंडीकेटर, आणि मुव्हींग ॲव्हरेज या महत्त्वाच्या टेक्निकल इंडीकेटर्सचा अभ्यास करूनच शेअर खरेदी केला पाहिजे. 

४. होल्डिंग कालावधी – Holding period :

कोणताही शेअर खरेदी केल्यानंतर तुम्ही अनुभवले असेलच कि तो शेअर नक्कीच खाली येतो, तसेच काही वेळेस शेअर खरेदी केल्यानंतर तो खुप वर जात राहतो त्यामुळे आपल्याला समजत नाही कि शेअर किती दिवस सांभाळायचा.

त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या कि शेअरची किंमत चढण्या आणि उतरण्यामागे समोरील काही महत्त्वाचे मुद्दे कारणीभूत आहेत :

४.१ डिमांड आणि सप्लाय :

काही कारणास्तव जसे कि शेअरबद्दल positive न्युज किंवा रेटिंगमधील सुधारणा अशा बर्याच बातम्या किंवा आणखी कारणे असु शकतात ज्यामुळे शेअरची डिमांड वाढते तसेच लोक त्या शेअरबद्दल बुलीश असल्याने सप्लाय कमी होतो. त्यामुळे शेअरची किंमत वाढु लागते तसेच परिस्थिती याउलट असल्यास शेअरची किंमत पडायला लागते. 

४.२ बाजारातील बातम्या :

शेअरबाजारात विशिष्ट शेअरबद्दल न्युज चालुच असतात जे विशिष्ट न्युज चॅनल तसेच किंवा युट्युब चॅनेल्सचे कामच असते ज्यामुळे त्यांना पैसे मिळत असतात. परंतु यामधील काही बातम्या खर्या तर काही फेकसुध्दा असतात, त्यामुळे शेअरच्या किंमतीत आपल्याला हालचाल पहायला मिळते. 

४.३ कंपनीचा व्यवसाय :

कंपनीचा व्यवसाय कसा चालु आहे हे आपल्याला कंपनीच्या तिमाही निकालातुन तसेच कंपनीच्या बॅलन्स शीटच्या अभ्यासातून आपल्याला समजते. जर का कंपनीच्या व्यवसायात आपल्याला चांगली ग्रोथ पहायला मिळाली कि तो शेअर त्वरित वर जाताना आपल्याला पहायला मिळतो. 

ज्यावेळेस कंपनीच्या व्यवसायात ग्रोथ पहायला मिळते तेव्हा शेअरच्या किंमतीत जी वाढ होणार असते ती दिर्घकाळ टिकणारी असते. 

४.४ मोठ्या ट्रेडर्सचा खेळ :

मोठे मोठे ट्रेडर्स ज्यांच्याकडे अफाट पैसा असतो असे ट्रेडर्स शेअरला हवे तसे वर घेऊन जातात तसेच हवे तसे खाली आणतात. 

यामाध्यमातून असे ट्रेडर्स आपला नफा बरोबर काढून घेतात आणि यामध्ये साधारण लोकांचे पैसे पुर्णपणे बुडतात कारण ज्यावेळेस हे मोठे ट्रेडर्स बाहेर पडतात, त्यावेळी शेअर पुन्हा पूर्वस्थितीत येतो. 

अशाप्रकारे आपण शेअरच्या किंमतीत कशी चढ उतार होते आणि त्यामागची महत्त्वाची कारणे सविस्तररीत्या पाहिली. 

५. शेअरमधुन कधी बाहेर पडावे – Exit of trade 

तुम्ही खरेदी केलेला शेअर कधी विकावा आणि त्यापासून जास्तीत जास्त नफा कसा मिळवावा हा एक खुप महत्त्वाचा मुद्दा आहे. 

वरती आपण पाहिल्याप्रमाणे शेअर खरेदी करताना आणि विकताना आपण फंडामेंटल आणि टेक्निकल इंडीकेटर्सचा उपयोग केला पाहिजे. 

फंडामेंटल इंडीकेटर्समध्ये जेव्हा पीबी रेशो तसेच पीई रेशो जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त वाढतो तेव्हा शेअर विकावा. तसेच या रेशोचा विचार करत जेव्हा शेअर ५२ आठवड्याचा वर जाताना दिसतो तेव्हा शेअर विकावा.

टेक्निकल इंडीकेटर्समध्ये जेव्हा आरयसआय आपल्याला ७० पेक्षा वर जाताना पहायला मिळतो तेव्हा शेअर विकावा. तसेच जेव्हा MACD आणि PRINGS KST च्या ग्राफमध्ये जेव्हा लाल रेखा जेव्हा दुसऱ्या रेशेला वरच्या दिशेला छेदून खाली येते तेव्हा ट्रेंड निगेटिव्ह समजला जातो. (Trading meaning in marathi)

 

४. Conclusion : निष्कर्ष (ट्रेडिंग म्हणजे काय? – Trading meaning in marathi)

आज आपण ट्रेडिंग म्हणजे काय (Trading meaning in marathi), ट्रेडिंग प्रॅक्टिकली कशी करतात, ट्रेडिंगसंबंधी महत्वाच्या संज्ञा आणि ट्रेडिंगचे प्रकार सविस्तररित्या समजुन घेतले. 

थोडक्यात ट्रेडिंग किंवा stock trading म्हणजे तुम्हाला हवा असलेला शेअर / शेअर्स तुमच्या पसंतीच्या किंमतीला खरेदी करणे आणि काही कालावधीनंतर तो शेअर / शेअर्स कॅल्क्युलेटेड नफा कमवुन विकणे म्हणजेच ट्रेडिंग होय

तो जो होल्डिंग पिरियड असतो तो जर काही मिनिटे असेल तर त्याला स्काल्पर ट्रेडिंग म्हणतात.

होल्डिंग पिरियड जर एकदिवसीय असेल तर त्याला इंट्रा डे ट्रेडिंग म्हणतात. 

होल्डिंग पिरियड हा काही दिवस किंवा काही आठवडे असेल तर त्याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात. 

होल्डिंग पिरियड हा जर काही दिवसांपासून ते महिन्यापर्यंत परंतु एका वर्षाच्या आत असला तर त्याला पोजीशनल ट्रेडिंग म्हणतात. 

होल्डिंग पिरियड हा जर एका वर्षापेक्षा जास्त ते पाच वर्षांपर्यंत असेल तर त्याला लॉँग टर्म ट्रेडिंग म्हणतात. 

 

५. FAQ ( ट्रेडिंग म्हणजे काय? – Trading meaning in marathi) : 

१. ट्रेडिंग म्हणजे काय?

ट्रेडिंग किंवा stock trading म्हणजे तुम्हाला हवा असलेला शेअर / शेअर्स तुमच्या पसंतीच्या किंमतीला खरेदी करणे आणि काही कालावधीनंतर तो शेअर / शेअर्स कॅल्क्युलेटेड नफा कमवुन विकणे म्हणजेच ट्रेडिंग होय.

२. ट्रेडिंगचे किती आणि कोणते प्रकार पडतात ?

शेअर होल्ड करन्याच्या कालावधीनुसार ट्रेडिंगचे पुढील महत्त्वाचे प्रकार पडतात:-

१. इंट्रा डे ट्रेडिंग – Intra day trading (एक दिवस)

२. स्विंग ट्रेडिंग – Swing trading (काही दिवस ते काही आठवडे)

३. स्काल्पर ट्रेडिंग – Scalper trading (काही मिनिटे)

४. पोजीशनल ट्रेडिंग – Positional trading (काही दिवस ते एक वर्ष)

५. लॉंग टर्म ट्रेडिंग – Long term trading (एक ते पाच वर्ष)

 

—-   धन्यवाद  —-

शेअर मार्केट अभ्यास या विषयात माझी आणि मार्केटसागर.com ची हि important post आहे, जर तुम्हाला आवडली तर नक्की संकेत द्या…. 

धन्यवाद
कृपया आपला अनुभव शेअर करा

1 thought on “ट्रेडिंग म्हणजे काय? | Trading meaning in marathi 5 min big information”

Leave a Comment