Trading account म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ म्हणजे व्यापार खाते हा होय, हा शब्द शेअर बाजाराशी संबंधित आहे. (Trading account meaning in marathi)
ज्यावेळी आपल्याला पैश्याचा व्यवहार करायचा असतो म्हणजेच आपल्याला बॅंकेत पैसे टाकायचे आहेत किंवा बॅंकेतून पैसे काढायचे आहेत, अशावेळेस आपल्याला बॅंक अकाउंट किंवा खात्याची आवश्यकता असते.
त्याचप्रमाणे ट्रेडिंग अकाउंट असे खाते किंवा अकाउंट ज्याचा उपयोग करून आपण शेअर बाजारात लिस्टेड कोणत्याही कंपनीचे शेअर आपण खरेदी किंवा विक्री करु शकतो.
ट्रेडिंग अकाउंट हा बॅंक खाते, शेअर बाजार, आणि डिमॅट अकाउंट या तिघांमधील दुवा आहे. कारण बॅंक खात्यातील पैसे प्रथम ट्रेडिंग अकाउंटमध्ये जातात त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्यामार्फत आपण शेअर बाजारात पैसे देऊन शेअर खरेदी करतो. त्यानंतर ते खरेदी केलेले शेअर्स डिमॅट अकाउंटमध्ये स्टोअर केले जातात.
चला तर मग भावांनो आज मार्केटसागर.com या आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपण trading account meaning in marathi म्हणजे काय?, ट्रेडिंग अकाउंटचे फायदे आणि तोटे, कमी पैस्यामध्ये कुठे ट्रेडिंग अकाउंट मिळते, घरी बसल्या ट्रेडिंग अकाउंट कसे उघडता येते हि सर्व माहिती आज आपण practically समजुन घेणार आहोत.
ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय – Trading account meaning in marathi :
ट्रेडिंग अकाउंट म्हणजे शेअर बाजाराशी संबंधित असे अकाउंट ज्याच्यामार्फत आपण आपल्या पैश्यांच्या उपयोग करून शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी किंवा विक्री करु शकतो.
ट्रेडिंग अकाउंटच्यामार्फत आपण विविध प्रकारच्या ट्रेडिंग जसे कि इंट्रा डे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, शॉर्ट सेलिंग, लॉंग टर्म ट्रेडिंग, अशा विविध प्रकारच्या ट्रेडिंग करून मोठा नफा कमावु शकतो.
ट्रेडिंग अकाउंटच्यामार्फत आपण विविध प्रकारच्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करु शकतो. जसे की आपण जे सिमकार्ड वापरतो ती रिलायन्स इंडस्ट्रीज हि कंपनी. समोरील छायाचित्रात आपण झिरोधा काईट या ट्रेडिंग ॲपमधील रिलायन्स हि कंपनी आणि तीचा शेअर भाव हा २७०० रुपये आपण पाहू शकतो.
तसेच आणखी एक प्रसिद्ध सिमकार्ड आणि टेलीकॉम कंपनी म्हणजे भारती एअरटेल कंपनी हि कंपनी सध्या ६८५ रुपये प्रति शेअर उपलब्ध आहे.
तसेच आपल्या ओळखीची आणि प्रसिद्ध अशा मारुती सुझुकी हि कार बनवणारी कंपनी, टाटा मोटर्स हि कार आणि इतर व्हेहीकल बनवणारी कंपनी, इन्फोसिस हि सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी, बजाज ऑटो हि दुचाकी आणि रिक्षा बनवणारी कंपनी, अशा बर्याच मोठ्या कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत.
अशाप्रकारे आपण या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून या कंपन्याचे तेवढ्या प्रमाणात हिस्सेदार किंवा मालक बनु शकतो. त्यामुळे जसा जसा कंपनीचा उद्योग आणि व्यावसाय वाढत जातो तसाच शेअरचा भावही वाढत जातो आणि आपल्याला मोठा नफा होतो. (Trading account meaning in marathi)
१. ट्रेडिंग अकाउंट as investment – Trading account in marathi :
जर का तुम्ही ट्रेडिंग अकाउंट (trading account in marathi) उघडुन Infosys या सॉफ्टवेअर कंपनीचे १०,००० रुपयांचे शेअर्स खरेदी १९९३ साली खरेदी केले असते तर ते १०,००० रुपये तुमचे आज २ करोड रुपये असते.
विश्वास बसत नसेल परंतु हे सत्य आहे. चला तर मग समजून घेऊयात कि १०,००० रुपयांचे २ करोड कशे झाले.
१४ जुन १९९३ रोजी इन्फोसिस कंपनीचा शेअर हा शेअर बाजारात १४५ रुपयांवरती लिस्ट झाला. आयपीओमध्ये त्याची इशु प्राइस हि ९५ रुपये इतकी होती. म्हणजे इन्फोसिस कंपनीचा शेअर ५० रुपयांच्या प्रिमियमवरती लिस्ट झाला.
त्यानंतर कंपनीने खालीलप्रमाणे बोनस शेअर्स जाहीर केले :-
१९९४ साली १:१ = १००*२ = २०० शेअर्स झाले.
१९९७ साली १:१ = २००*२ = ४०० शेअर्स झाले.
१९९९ साली १:१ = ४००*२ = ८०० शेअर्स झाले.
१९९९ साली स्टॉक split face value रु १० ते ५ रुपये = ८००*२ = १६००
२००४ साली ३:१ बोनस = १६००*४ = ६४०० शेअर्स झाले.
२००६ साली १:१ बोनस = ६४००*२ = १२८०० शेअर्स झाले.
२०१४ साली १:१ बोनस = १२८००*२= २५६०० शेअर्स झाले.
२०१५ साली १:१ बोनस = २५६००*२ = ५१२०० शेअर्स झाले.
अशाप्रकारे फक्त बोनस शेअर्स आणि शेअरची मार्केटमधील वाढलेली किंमत जर कॅल्क्युलेशनमध्ये घेतली तर :
१७०० रुपये * ५१२०० शेअर्स = ८८,७४०,००० = ८.८७ करोड रुपये आज म्हणजे ऑक्टोबर २०२१ रोजी.
म्हणजे १९९३ साली जर तुम्ही १०० शेअर्स हे १०,००० रुपयांना खरेदी केले असते तर ते आज वरती पाहिल्याप्रमाणे ८.८७ करोड रुपये झाले असते. तरी आपण यामध्ये कंपनीने जाहीर केलेला डिवीडंड पकडलेला नाहीये.
२. ट्रेडिंग अकाउंट as Big Loss – trading account information in marathi :
जर का तुम्ही पाच वर्षांपूर्वी नवीन ट्रेडिंग अकाउंट ओपन करून जर का एस बॅंक या बॅंकेचे १०,५०० रुपयांचे शेअर्स प्रति शेअर ३५० रुपयाने खरेदी केले असते.
म्हणजे ३५० रुपये * ३० शेअर्स = १०,५०० रुपये.
तर आज तुम्हाला नफा तर सोडाच परंतु तुमची मुद्दल रक्कमसुध्दा गमवावी लागली असती. आज तुमच्या शेअर्सची किंमत किती असती ते आपण आता पाहुयात.
१४ रुपये * ३० शेअर्स = ४२० रुपये
म्हणजे तुम्ही आज या एस बॅंक शेअरमुळे ९६% loss मध्ये असतात. तुमची मेहनतीने कमावलेली सारी कॅपिटल या एका शेअरमुळे आणि या ट्रेडिंग अकाउंटमुळे (trading account information in marathi) संपुष्टात आली.
३. ट्रेडिंग अकाउंटचे १० फायदे – 10 Benefits of trading account information in marathi :
१. ट्रेडींग अकाउंटमुळे आपण शेअरमार्केटमधील कोणत्याही कंपन्यांचे शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकतो.
२. शेअर्स खरेदी आणि विक्री करण्यासाठी कोणत्याही कागदोपत्री प्रक्रियेची आवश्यकता नाही.
३. शेअर्सची खरेदी आणि विक्री प्रक्रिया online तुमच्या मोबाईल द्वारे किंवा Computer द्वारे करता येते.
४. Online प्रक्रियेमुळे शेअर्सची खरेदी आणि विक्री ही fast आणि काही microsecond मध्ये करता येते.
५. इंट्रा-डे ट्रेडिंग मध्ये तुम्हाला मार्जिन सेफटी मिळते, म्हणजे समजा तुमच्याकडे जर १०,००० रुपये आहेत तर तुम्ही २०,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचे शेअर्स खरेदी करू शकता .
६. पूर्वीप्रमाणे रिलेशनशिप मॅनेजरला शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्यासाठी फोन करण्याची आवश्यकता नाही.
७. शेअर्स खरेदी किंवा विक्रीसाठी शेअर बाजार बंद झाल्यावर सुद्धा तुम्ही order टाकून ठेवू शकता. Example:- झिरोधामध्ये Creat GTT.
८. विविध कंपन्याबद्दलच्या न्यूज, विविध चार्ट्स, फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसीस तुम्हाला अशी बरीच माहिती ट्रेंडिंग अकाउंट प्रोव्हायडर्सकडे मिळते.
९. शेअर्स खरेदी आणि विक्रीसाठी tips आणि Research report सुद्धा उपलब्ध होतात.
१०. रिलेशन मॅनेजर उपलब्ध असल्याने तुम्ही त्यांच्याशी एखाद्या शेअर बद्दल चौकशी आणि माहिती मिळवु शकता.
४. ट्रेंडिंग अकाउंट उघडण्यासाठी मर्यादा आणि Document – Trading account Eligibility marathi :
१. फोटो Identity : खालील यादीपैकी आवश्यकतेनुसार,
पॅनकार्ड
ड्रायव्हिंग लायसन्स
आधार कार्ड
पासपोर्ट
मतदान कार्ड
२. इनकम proof : खालील यादीपैकी आवश्यकतेनुसार,
Bank statement त्यामध्ये शेवटच्या सहा महिन्याचे Average बॅलन्स ही १०,००० रुपयाच्यावर असावे.
Salary slip – कमीतकमी १५,००० रुपये सॅलरी असावी.
ICR terms – त्यामध्ये वार्षिक उत्पन्न १,२०,००० रुपयाच्यावरती असावे.
Form १६ – वार्षिक उत्पन्न १,२०,००० रूपयांच्यावरती असावे.
Certificate of Networth – त्यामध्ये Networth दहा लाखांपेक्षा जास्त असली पाहिजे.
३. Address proof :
Electricity बिल
टेलिफोन बिल
राशन कार्ड
पासपोर्ट
मतदान कार्ड
४. पासपोर्ट साईजचा तुमचा फोटो.
५. बँक अकाउंट जे तुमच्या नावावरती असले पाहिजे.
६. त्या बँकेचा कॅन्सल केलेला चेक .
७. वयोमर्यादा :- ट्रेडींग अकाउंट उघडण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाहीये. परंतु 18 वर्षाखालील बालकांसाठी Guardian म्हणजे parents ची माहिती द्यावी लागते.
५. ट्रेडिंग अकाउंट कुठे मिळेल – Best Trading account providers in marathi :
आपल्यासारख्या सर्वसाधारण लोकांना ज्यांना शेअर मार्केट, शेअर्स त्यांपासून मिळणारा नफा तोटा यांबद्दल काहिच माहिती नसते. त्यांच्यासाठी ट्रेडिंग अकाउंट कुठे मिळेल किंवा कुठे उघडावे हा मोठा प्रश्न आहे.
चला तर मग जाणून घेऊयात आपण ट्रेडिंग अकाउंट कुठे कुठे उघडु शकतो आणि ते सर्व पर्याय सविस्तरपणे समजून घेऊयात. कोणते ट्रेडिंग अकाउंट आपल्यासाठी फायदेशीर असेल हेसुद्धा आपण आता पाहणार आहोत. (Trading account meaning in marathi)
१. झिरोधा – Zerodha :
झिरोधा हा एक डिस्काउंट ब्रोकर आहे आणि हा भारतातील पहिला आणि सर्वप्रथम सुरू झालेला डिस्काउंट ब्रोकर आहे. झिरोधा हि प्रामुख्याने बेंगलोरची कंपनी आहे आणि तीचे मुख्य ऑफिस बेंगलोरमध्ये स्थित आहे.
इक्विटी इंट्रा डे ट्रेडिंग – २० रुपये / ट्रेड किंवा ०.०३ % यापैकी जे कमी असेल ते.
डिलिव्हरी ट्रेडिंग – शुन्य रुपये
हि ट्रेडिंग पुर्णपणे मोफत नसुन यामध्ये Dp charges 13.5+gst = 15.9 रुपये आणि वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स समाविष्ट असतात.
अकाउंट ओपनिंग चार्जेस :
१. ऑनलाईन २०० रुपये यामध्ये आधारकार्ड लागते.
२. ऑफलाईन ४०० रुपये यामध्ये तुम्हाला काही कागदपत्रे आणि फॉर्म पोस्टाने पाठवावा लागतो.
लगेचच झिरोधामध्ये ट्रेडिंग अकाउंट उघडा :
समोरील लींकवरती तुम्ही झिरोधामध्ये लगेचच ट्रेडिंग अकाउंट उघडु शकता.
२. अपस्टॉक्स – Upstox :
झिरोधानंतर भारतातील अपस्टॉक्स हा दुसरा मोठा डिस्काउंट ब्रोकर आहे. अपस्टॉक्स हि मुंबई स्थित कंपनी आहे.
अपस्टॉक्स या कंपनीमध्ये टाटा कंपनीचे ओनर रतन टाटा यांची हिस्सेदारी आहे.
इक्विटी इंट्रा डे ट्रेडिंग – २० रुपये / ट्रेड किंवा ०.०५ % यापैकी जे कमी असेल ते.
डिलिव्हरी ट्रेडिंग – शुन्य रुपये
हि ट्रेडिंग पुर्णपणे मोफत नसुन यामध्ये Dp charges आणि वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स समाविष्ट असतात.
अकाउंट ओपनिंग चार्जेस :
ऑनलाईन शुन्य रुपयात अकाउंट उघडता त्यासाठी तुम्हाला आधारकार्ड आणि पॅन कार्ड लागते.
लगेचच अपस्टॉक्समध्ये ट्रेडिंग अकाउंट उघडा :
समोरील लींकवरती तुम्ही अपस्टॉक्समध्ये लगेचच free ट्रेडिंग अकाउंट उघडु शकता.
—>> Upstox मध्ये लगेचच अकाउंट उघडा.
३. एंजल ब्रोकींग – Angel Broking :
एंजल ब्रोकिंग हि मुंबई स्थित कंपनी आहे, इ. स. १९८७ पासून हि कंपनी कार्यरत आहे. २०१९ च्या मध्यापर्यंत हि कंपनी ट्रेडिंग चार्जेस टक्केवारीमध्ये आकारत होती परंतु आता झिरोधाप्रमाणे फिक्स चार्जेस आकारते.
एंजल ब्रोकिंगमध्ये ट्रेडिंग अकाउंट उघडण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे कंपनी मोफत stock suggestions आणि research reports देते.
इक्विटी इंट्रा डे ट्रेडिंग – २० रुपये / ट्रेड.
डिलिव्हरी ट्रेडिंग – शुन्य रुपये
हि ट्रेडिंग पुर्णपणे मोफत नसुन यामध्ये Dp charges आणि वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स समाविष्ट असतात.
अकाउंट ओपनिंग चार्जेस :
ऑनलाईन शुन्य रुपयात अकाउंट उघडता त्यासाठी तुम्हाला आधारकार्ड आणि पॅन कार्ड लागते.
लगेचच एंजल ब्रोकिंगमध्ये ट्रेडिंग अकाउंट उघडा :
समोरील लींकवरती तुम्ही एंजल ब्रोकिंगमध्ये लगेचच free ट्रेडिंग अकाउंट उघडु शकता.
—>> Angle Broking / One मध्ये लगेचच अकाउंट उघडा.
४. आय.आय.एफ.एल- IIFL :
आय.आय.एफ.एल म्हणजे इंडिया इन्फोलाइन हि कंपनी इ. स. १९९५ पासून कार्यरत आहे. हि एक इंटरनॅशनल कंपनी आहे आणि हिचे अस्तित्व दुबई, न्यूयॉर्क, हॉंगकॉंग, सिंगापूर, लंडन इथेसुद्धा आहे.
इंडिया इन्फोलाइन हि एक भारतातील नामांकित सर्वीस प्रोव्हायडर कंपनी आहे.
इक्विटी इंट्रा डे ट्रेडिंग – २० रुपये / ट्रेड किंवा ०.०५ % यापैकी जे कमी असेल ते.
डिलिव्हरी ट्रेडिंग – शुन्य रुपये
हि ट्रेडिंग पुर्णपणे मोफत नसुन यामध्ये Dp charges आणि वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स समाविष्ट असतात.
अकाउंट ओपनिंग चार्जेस :
ऑनलाईन शुन्य रुपयात अकाउंट उघडता त्यासाठी तुम्हाला आधारकार्ड आणि पॅन कार्ड लागते.
लगेचच IIFL मध्ये ट्रेडिंग अकाउंट उघडा :
समोरील लींकवरती तुम्ही IIFL मध्ये लगेचच free ट्रेडिंग अकाउंट उघडु शकता.
—>> IIFL मध्ये लगेचच अकाउंट उघडा.
५. शेअरखान – Sharekhan :
शेअरखान हि कंपनी इ. स. २००० पासून कार्यरत आहे. सर्वसाधारण लोकांसाठी ट्रेडिंग किंवा इंट्रा डे ट्रेडिंगसाठी हा पर्याय योग्य नाही कारण या कंपनीचे चार्जेस तुलनेने थोडे जास्त आहेत.
इक्विटी इंट्रा डे ट्रेडिंग – ०.१% खरेदी आणि विक्री दोन्हीवरती, किंवा कमीत कमी ५ पैसे प्रति शेअर.
डिलिव्हरी ट्रेडिंग – ०.५ % खरेदी आणि विक्री दोन्हीवरती, किंवा कमीत कमी १० पैसे प्रति शेअर.
शेअरखान या ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्या मोबाईल रिचार्जसारखे विविध पोस्टपेड प्लॅन उपलब्ध असतात, ज्याचा उपयोग करून आपण आपले ट्रेडिंग चार्जेस कमी करु शकतो.
अकाउंट ओपनिंग चार्जेस :
ऑनलाईन शुन्य रुपयात अकाउंट उघडता त्यासाठी तुम्हाला आधारकार्ड आणि पॅन कार्ड लागते.
लगेचच शेअरखानमध्ये ट्रेडिंग अकाउंट उघडा :
समोरील लींकवरती तुम्ही शेअरखानमध्ये लगेचच free ट्रेडिंग अकाउंट उघडु शकता.
—>> Sharekhan मध्ये लगेचच अकाउंट उघडा.
(Trading account meaning in marathi)
६. मोतीलाल ओस्वाल – Motilal Oswal :
मोतीलाल ओस्वाल यांच्याकडे ट्रेडिंग अकाउंट उघडण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची सर्वीस आणि रिलेशन मॅनेजर सुविधा जे आपल्याला सजेशन्स आणि रिसर्च रिपोर्ट्स देतात.
इक्विटी इंट्रा डे ट्रेडिंग – ०.०५%
डिलिव्हरी ट्रेडिंग – ०.५ %
अकाउंट ओपनिंग चार्जेस :
ऑनलाईन शुन्य रुपयात अकाउंट उघडता त्यासाठी तुम्हाला आधारकार्ड आणि पॅन कार्ड लागते.
लगेचच मोतीलाल ओस्वालमध्ये ट्रेडिंग अकाउंट उघडा :
समोरील लींकवरती तुम्ही मोतीलाल ओस्वालमध्ये लगेचच free ट्रेडिंग अकाउंट उघडु शकता.
—>> Motilal Oswal मध्ये लगेचच अकाउंट उघडा.
७. आयसीआयसीआय डायरेक्ट – ICICI Direct :
आयसीआयसीआय डायरेक्टमध्ये 3 इन 1 अकाउंट सुविधा असल्याने फंड ट्रान्सफर जलद होते. या ट्रेडिंग अकाउंटमध्ये तुम्हाला जरी चार्जेस जास्त दिसत असले तरी विविध प्लॅनचा उपयोग करून तुम्ही ब्रोकरेज कमी करु शकता. (Trading account meaning in marathi)
इक्विटी इंट्रा डे ट्रेडिंग – ०.२७५%
डिलिव्हरी ट्रेडिंग – ०.५५ %
आयसीआयसीआय या ट्रेडिंग अकाउंटमध्ये विविध प्लॅन उपलब्ध असतात, ज्याचा उपयोग करून आपण आपले ट्रेडिंग चार्जेस कमी करु शकतो.
अकाउंट ओपनिंग चार्जेस :
आयसीआयसीआय बॅंकेत जाऊन आपण ट्रेडिंग अकाउंट उघडु शकतो. ट्रेडिंग अकाउंटसाठी ९७५ रुपये आणि डिमॅट अकाउंटसाठी ७०० रुपये फि आकारली जाते.
तसेच समोरील लींकवरती तुम्ही ICICI Direct मध्ये लगेचच free ट्रेडिंग अकाउंट उघडु शकता.
—>> ICICIdirect मध्ये लगेचच अकाउंट उघडा.
६. ट्रेंडिंग अकाउंट कसे उघडावे : How to open trading account in marathi :
वरती आपण विविध डिस्काउंट ब्रोकर आणि इतर काही माध्यमे पाहिली ज्याच्या माध्यमातून आपण ट्रेडिंग अकाउंट उघडु शकतो.
जवळजवळ सर्वच अकाउंट प्रोव्हायडर्सकडे सध्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे, ज्याच्या मार्फत आपण ट्रेडिंग अकाउंट उघडु शकतो.
चला तर मग आपण आता झिरोधा या डिस्काउंट ब्रोकर कडे कसे अकाउंट उघडतात ते पाहुयात. (Trading account meaning in marathi)
६.१ झिरोधामध्ये ट्रेंडिंग अकाउंट कसे उघडतात? – Zerodha trading account opening stepwise process in marathi :
चला तर मग झिरोधामध्ये ट्रेंडिंग अकाउंट कसे उघडायचे ते आपण आता प्रॅक्टिकली आणि stepwise पाहणार आहोत. (Trading account meaning in marathi)
१. समोर दिलेल्या लिंकवरती क्लिक करा, मग आपला ट्रेंडिंग अकाउंट उघडण्याचा प्रवास चालू होईल.
२. वरती दिलेल्या लिंकवरती क्लिक केल्यावर तुम्हाला समोरील दाखवलेल्या चित्रातील इंटरफेस पहायला मिळेल.
त्यामध्ये Sign up Now म्हणजे झिरोधामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रथम तुम्हांला तुमचा मोबाईल नंबर टाइप करावा लागेल. त्यानंतर continue वरती क्लिक करा.
त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती sms स्वरूपात OTP येईल, आणि तो OTP तुम्हाला आपल्या उघडलेल्या समोरील चित्रातील window मध्ये टाकून continue करावे लागेल.
३. त्यानंतर समोरील चित्रातील इंटरफेस उघडेल त्यामध्ये तुम्हांला Your details म्हणजे तुमच्याबद्दल माहिती टाकावी लागते. त्यामध्ये प्रथम Name म्हणजे तुमचे पूर्ण नाव टाकावे.
त्यानंतर तुमचा Email ID टाकावा. जो की currently चालू असला पाहिजे. त्यानंतर continue या बटनवरती क्लिक करा.
४. त्यानंतर तुमच्या Email id वरती एक मेल येईल आणि त्यामध्ये आलेला OTP तुम्हाला समोरील चित्रात दिसणाऱ्या रकान्यात टाकायचा आहे त्यानंतर continue वरती क्लिक करा.
५. त्यानंतर समोरील चित्रातील window ओपन होईल त्यामध्ये PAN म्हणजे तुमचा पॅन नंबर टाका आणि त्याच्याखाली D.O.B. म्हणजे तुमची जन्मतारीख (Date of birth) जी पॅन कार्ड वरती नमूद आहे ती टाकावी त्यानंतर Continue वरती क्लिक करा.
६. त्यानंतर समोरील चित्रातील विंडो ओपन होईल त्यामध्ये कोणत्या प्रकारचे ट्रेडिंग अकाउंट उघडायचे आहे ते टाकावे लागेल. त्यामध्ये Equity, F&O, Currency आणि Commodity यांचे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकी तुम्हाला हव्या असलेल्या किंवा सर्व पर्यायांची निवड तुम्ही करू शकतात.
त्यानंतर खाली तुम्हाला Amount 200 रुपये इतकी जमा करण्यासाठी Upi किंवा card / Netbanking / wallet यापैकी एका पर्यायाची निवड करावी लागते आणि शेवटी pay & continue वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला payment window पाहायला मिळेल त्यामधून व्यवस्थित payment ची प्रोसेस पूर्ण करा.
७. Payment ची प्रोसेस पूर्ण झाल्यावर समोरील Aadhar KYC digilocker ची window ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला Continue to digilocker या बटन वर ती क्लिक करायचे आहे.
८. त्यानंतर Digilocker ची government website ओपन होईल ती तुम्हाला समोरील चित्रांमध्ये पाहायला मिळेल. त्यामध्ये दाखवलेल्या तीन रकान्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून Next या बटनवरती क्लिक करायचे आहे.
त्यानंतर एक नवीन window open होईल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती आलेला नवीन OTP टाकून Continue या बटन वरती क्लिक करायचे आहे.
९. त्यानंतर पुढील चित्रात दाखवलेली window ओपन होईल, त्यामध्ये झिरोधाला तुमच्या digilocker मधील आधार कार्ड बद्दल माहिती हवी असते. त्यासाठी खाली दिलेल्या Allow या बटणवर क्लिक करा.
Allow केल्यानंतर तुम्हाला झिरोधाकडून यासाठी success चा इंटरफेस पाहायला मिळेल अशा प्रकारे तुमची Aadhar KYC प्रोसेस पूर्ण होईल.
१०. त्यानंतर Next window म्हणजे Your profile उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या parents बद्दल माहिती टाकावी लागेल. त्यामध्ये Father ‘s first name म्हणजे वडिलांचे नाव त्यानंतर Father’s last name म्हणजे वडिलांचे आडनाव, त्यानंतर mother’s first name म्हणजे आईचे नाव.
त्यानंतर mother’s last name म्हणजे आईचे आडनाव टाकावे लागेल.
त्यानंतर Background हा टप्पा येतो. त्यामध्ये Annual income म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न, त्यानंतर Funds & securities settlement preference हा किती दिवसांनी करायचा त्याची निवड करा.
त्यानंतर Trading experience म्हणजे तुमचा ट्रेंडिंग करण्याचा अनुभव निवडा. त्यानंतर occupation म्हणजे तुमचा व्यवसाय निवडा. शेवटी तुम्ही politics शी संबंधित आहात का हा पर्याय भरुन continue या बटनवरती क्लिक करा.
११. त्यानंतर Link Bank Account ही step ओपन होईल. त्यामध्ये समोरील चित्रात दाखवल्याप्रमाणे Branch’s IFSC कोड टाकावा लागेल. तसेच Branch MICR code आणि शेवटच्या दोन रकान्यात Bank account number टाकावा लागतो.
त्यानंतर खालच्या चार terms च्या समोर असलेल्या चौकोनी डब्यात टिकमार्क करावे आणि शेवटी continue या बटनवरती क्लिक करा.
१२. त्यानंतर webcam verification ही window ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला समोरील चित्रात दाखवलेला नंबर एका कोर्या कागदावरती प्रिंट करून किंवा लिहून ऑनलाईन छोटासा व्हिडिओ सबमिट करायचा असतो. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे तो कागद तुम्हाला हातात धरूनच व्हिडिओ बनवायचा आहे.
खालच्या चौकोनी कप्प्यात तुमचा व्हिडीओ शुट करावा लागतो आणि शेवटी Continue या मोठ्या बटनवरती क्लिक करा.
१३. त्यानंतर upload document ही window ओपन होईल. त्यामध्ये प्रथम copy of cancelled cheque किंवा statement ही upload करायची आहे. ज्यामध्ये तुमच्या नावासोबत तुमचा बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड असला पाहिजे.
त्यानंतर Income proof चे document upload करावे लागते. परंतु हा पर्याय optional आहे. ज्याची Equity trading साठी आवश्यकता नाही. फक्त F&O trading साठी ते आवश्यक आहे.
त्यानंतर एका कोर्या कागदावरती केलेली तुमची signature तुम्हाला फोटोच्या स्वरूपात upload करायची आहे. परंतु ती signature पेन्सिल किंवा स्केचपेनने केलीली नसावी, तर ती आपल्या Regular पेननेच केलेली असावी.
त्यानंतर शेवटी तुमच्या (Copy of PAN) पॅन कार्डची फोटोकॉपी ज्याच्यावरती तुमची sign असेलच, ती upload करावी लागेल आणि नंतर continue या बटनवरती क्लिक करा.
१४. त्यानंतर Equity E-sign ही window ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला चित्रात दाखवल्याप्रमाणे E-sign या बटन वरती क्लिक करायचे आहे.
त्यानंतर terms & conditions चा pop-up उघडेल. त्यामध्ये तीनही चौकोनी रकान्यांना टिक मार्क करुन proceed to esign या बटनवरती क्लिक करा.
त्यानंतर NSDL Official website ची नवीन window मध्ये ओपन होईल. त्यामध्ये समोरील चित्रात दाखवल्याप्रमाणे तुमचा आधार नंबर टाकुन send OTP या बटन वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती आलेला OTP याच Website वरती खाली उघडलेल्या रकान्यात टाका.
त्यानंतर तुम्ही भरलेला पूर्ण Form तुम्हाला समोर ओपन होईल. त्यामध्ये शेवटी sign Now या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे.
त्यानंतर पुन्हा NSDL ची Window ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला पुन्हा Aadhar Number टाकून send OTP वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती आलेला OTP याच Website वरती खाली उघडलेल्या रकान्यात टाका.
नंतर नवीन Window ओपन होईल, त्यामध्ये signed successfully हा message पाहायला मिळेल.
त्यानंतर आपली सुरूवातीची Equity eSign ची window ओपन होईल, त्यामध्ये Finish या बटनवरती क्लिक करा.
१५. शेवटी congratulations असा message तुम्हाला तुमच्या screen वरती पहायला मिळेल. अशाप्रकारे तुमचे ट्रेडिंग अकाउंट उघडण्याची शेवटची पायरी पूर्ण झाली आहे.
त्यानंतर तुमच्या E-mail ID वरती एक E-mail येईल. त्यामध्ये तुमचा Login ID मिळेल व नंतर तुम्हाला पासवर्ड सेट करायचा असतो.
१६. त्यानंतर झिरोधा kite ही app तुम्हाला google play store मधून download करावी लागेल. ज्याचा वापर करून तुम्ही ट्रेडिंग अकाउंटमध्ये login करू शकता. अशा प्रकारे तुम्ही आता ट्रेडींग करू शकता.
६.२ मोबाईल नंबर तुमच्या आधारकार्डला लिंक नसल्यास :
तसेच अकाउंट ओपनिंग प्रोसेस मध्ये जर का तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधारकार्डला लिंक नसेल तर तुम्हाला manually form’s ची प्रिंट काढावी लागते. ते सर्व फार्म आणि कागदपत्रे भरून आणि sign करून झिरोधाच्या बेंगलोरच्या ऑफिसला कुरिअरने पाठवावे लागते.
त्यानंतर त्यांची सर्व प्रोसेस झाल्यानंतर त्याबद्दल तुम्हाला sms आणि E-mail ID व्दारे reply मिळतो आणि तुमची Account opening ची प्रोसेस पूर्ण होते.
७. सारांश – Conclusion – व्यापार खाते – Trading account meaning in marathi :
ट्रेडिंग अकाउंट किंवा व्यापार खाते म्हणजे शेअर बाजाराशी संबंधित असे अकाउंट ज्याच्यामार्फत आपण आपल्या पैश्यांच्या उपयोग करून शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी किंवा विक्री करु शकतो.
बरेच लोक म्हणतात इन्फोसिस कंपनीचा शेअर जर ११९५ साली खरेदी केला असता तर तुम्ही आज करोडपती असतात. परंतु १९९५ चा साल असा होता त्याकाळी मोबाईल नव्हता, कम्प्युटर पहायला मिळायचे नाही. तर मग त्याकाळी ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय हे तर सोडाच पण सामान्य लोकांना शेअर म्हणजे काय हेसुद्धा माहिती नव्हते.
त्यामुळे लोक शेअर खरेदी करू शकले नाही आणि मोठ्या संधींपासुन वंचीत राहीले. त्यामुळे आज आपण आपल्या आजच्या संधीपासुन वंचीत राहु नये म्हणुनच ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय (Trading account meaning in marathi) ह्या मोठ्या मुद्द्याला आम्ही आज पार मुळापर्यंत हात घातला आहे. (Trading account meaning in marathi)
८. FAQ – Trading account meaning in marathi :
१. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय ?
ट्रेडिंग अकाउंट (Trading account meaning in marathi) म्हणजे शेअर बाजाराशी संबंधित असे अकाउंट ज्याच्यामार्फत आपण आपल्या पैश्यांच्या उपयोग करून शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी किंवा विक्री करु शकतो.
२. शेअर बाजारात खाते कसे उघडायचे?
शेअर बाजारात शेअर खरेदी किंवा विक्री करण्यासाठी शेअर बाजारातील खाते म्हणजे trading account हे आपण ऑनलाईन पद्धतीने घरी बसल्यासुद्धा उघडु शकतो. Zerodha या डिस्काउंट ब्रोकरकडे आपण खूप कमी दरात ट्रेडिंग अकाउंट उघडु शकतो आणि ट्रेडिंग करू शकतो.
३. ट्रेडिंग अकाउंट कुठे उघडावे ?
ट्रेडिंग अकाउंट हे सर्वात कमी दरात हे आपण प्रथम झिरोधा आणि त्यानंतर Upstox या ब्रोकेरकडे ऑनलाईन पद्धतीने त्वरित आणि घरी बसल्यासुद्धा उघडु शकतो.
४. शेअर मार्केटमध्ये पैसे कसे गुंतवायचे ?
शेअर बाजारात पैसे गुंतवुन, श्रीमंत होण्यासाठी आपल्याला प्रथम ट्रेडिंग अकाऊंटची आवश्यकता असते. ज्याच्यामार्फत आपण शेअरची खरेदी आणि विक्री करू शकतो.
(Trading account meaning in marathi)
Read also :-
—- धन्यवाद —-
शेअर मार्केट अभ्यास या विषयात माझी आणि मार्केटसागर.com ची Trading account meaning in marathi हि important post आहे, जर तुम्हाला आवडली तर नक्की संकेत द्या…