मारुती सुझुकीचा नफा 48% कमी झाला शेअर पडणार? | Maruti suzuki share news in marathi Q3 Results Buy, sell or hold?

Maruti suzuki share news in marathi , मारुती सुझुकीचा नफा 48% कमी झाला शेअर पडणार? , Brokerage चे मत – Rating, Buy or Sell, Target price , Maruti Suzuki Dividend 2022…

मारुती सुझुकीचा नफा 48% कमी झाला शेअर पडणार? | Maruti suzuki share news in marathi Q3 Results Buy, sell or hold?

शेअर बाजार बंद असताना 26 जानेवारी 2022, बुधवारी मारुती सुझुकी या कार बनवणाऱ्या भारतातील leading कंपनीने आपले Q3 FY-2022 चे Results जाहीर केले. Maruti Suzuki कंपनीला या शेवटच्या Quarter मध्ये म्हणजेच डिसेंबर 2021 मध्ये मागच्या वर्षीच्या डिसेंबर Quarter पेक्षा 48% नफा कमी झाला असल्याचे पहायला मिळाले.

मारुती सुझुकी कंपनीने Q3 FY2022 मध्ये 1011 करोड रुपये नफा झाला असल्याचे नोंदवले आहे. तर मागच्या वर्षीच्या Q3 मध्ये कंपनीला 1941 करोड रुपयांचा नफा झाला होता. म्हणजेच कंपनीच्या नफ्यामध्ये खूप मोठी घसरण झाली आहे.

Maruti Suzuki चा share मंगळवारी 25 जानेवारीला जवळजवळ 8 टक्‍क्‍यांनी वाढुन 8650 रुपयांवर BSE मध्ये बंद झाला. त्यानंतर शेअर 27 जानेवारी आणि 28 जानेवारीला 8800 रुपयांपर्यंत जाऊन 8539 रुपयांवर बंद झालेला पहायला मिळाला.

Revenue :

मारुती सुझुकी कंपनीने शेवटच्या Quarter डिसेंबर 2021 मध्ये 23,246 करोड रुपयांचा Revenue नोंदवला. तर मागच्या वर्षीच्या Quarter मध्ये म्हणजेच डिसेंबर 2020 मध्ये कंपनीला 23,457 करोड रुपये Revenue झाला होता.

म्हणजेच कंपनीच्या Revenue मध्ये मागच्या वर्षीपेक्षा 211 करोड रुपयांची घसरण झालेली बघायला मिळाली आहे. हि कंपनी साठी एक Negative News आहे. (Maruti suzuki share news in marathi)

नफा का कमी झाला? :

1. मारुती सुझुकी कंपनीला Q3 FY2022 मध्ये कोरोनाच्या संकटाला तसेच काही ठिकाणी Lockdown ला सामोरे जावे लागले.

2. जगभरातील Semiconductor चा तुटवडा हे सुद्धा कंपनीचा नफा तसेच उत्पादन कमी होण्याचे सर्वात मोठे कारण आहे.

3. स्टीलचे वाढलेले भाव यामुळे कंपनीच्या नफ्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

या Raw Material मधील वाढत्या किंमतीमुळे कंपनीने आता Cost Reduction वरती काम करण्याचे ठरवले आहे. मारुती सुझुकीने जानेवारी 2022 मध्ये आपल्या सर्वच गाड्यांचे भाव 2 टक्क्यांनी वाढवले हेसुद्धा Raw Material च्या वाढत्या किंमतीमुळेच झाले आहे.

वाहनांचा Sale : 

मारुती सुझुकी कंपनीने या 2022 च्या तिसऱ्या Quarter मध्ये 4,31,000 Vehicles ची विक्री केली. तर यामध्ये कंपनीने sept-2022 या Quarter पेक्षा 13.5 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

कंपनीचा वाहनांचा Domestic Sale हा 3,67,000 झाला तर त्यामध्ये 14 टक्क्यांनी वाढ पहायला मिळाली. तसेच export सेलमध्ये 9 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली तर सेल 65,000 units चा झाला.

कंपनीने 2021 या वर्षातील 65,000 गाड्यांची विक्री हा सर्वात Highest सेल झाल्याचे सांगितले.

Maruti Suzuki Q3 2022 संपूर्ण रिझल्ट्स :

In Cr (करोड) Dec-2021 Dec-2020
महसूल (Revenue) 23,246 23,457
खर्च (Expenditure) -21,712 -21,260
PBT 1,221 2,449
कर (Tax) -210 -508
निव्वळ नफा (Net profit) 1,011 1,941
EPS (Rs) 33.48 64.27

Maruti Suzuki Dividend 2022 :

Maruti Suzuki ने शेवटचा dividend हा June 2021 ला 45 रुपये प्रति शेअर इतका दिला होता. यावर्षीच्या Quarterly 2022 च्या निकालात Maruti Suzuki ने आणखी कोणताही लाभांश जाहीर केलेला नाही.

शेअर बाजारातील लोकांचा दृष्टीकोन असतो कि Dividend दिला म्हणजे कंपनी चांगली आहे. परंतु असे न असता कंपनी त्या पैश्यांचा उपयोग उद्योग वाढीसाठी करत असते. अशाप्रकारे आपल्याला तो डिविडेंड शेअर price वाढीच्या रूपात दिसून येत असतो. (Maruti suzuki share news in marathi)

Brokerage चे मत – Rating, Buy or Sell, Target price : 

Brokerage Firm Rating Target Price
Axis Capital Sell 6900 रु
credit Suisse OUT-Perform 10,389 रु
Morgan Stanley Over-weight 10,600 रु
Macquarie OUT-Perform 9753 रु
citi BUY 10,000 रु
Goldman Sachs BUY 10,100 रु
CLSA Sell 6440 रु
Kotak securities Sell 7800 रु
Sharekhan BUY 9820 रु
Motilal Oswal BUY 10,300 रु

Buy रेटिंग तसेच Outperform रेटिंग देणार्‍या कंपन्यांच्या मते कंपनीचा नफा हा जागतिक semiconductor च्या तुटवड्यामुळे कमी झाला आहे. जागतिक semiconductor च्या तुटवड्यामुळे कंपनीचा 90,000 गाड्यांचा loss झाला आहे. म्हणजेच कंपनी यामुळे या गाड्या बनवू शकली नाही आणि Production कमी झाले.

तसेच मारुती सुझुकी कंपनी नवीन SUV Models च्या development मध्ये असल्यानेसुद्धा कंपनीच्या नफ्यात थोडी घसरण झाली आहे परंतु भविष्यात नक्कीच वाढ बघायला मिळेल.

—-   धन्यवाद  —-

शेअर बाजार बातम्या ह्या शेअर मार्केटमधील प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाच्या असतात हे नक्कीच शाश्वत सत्य आहे. जर तुम्हाला Maruti Suzuki share news in marathi हि News आणि माहिती आवडली तर नक्की संकेत द्या आणि comment करा…

ज्याच्यामुळे आम्हाला नक्कीच Motivation मिळेल. 

धन्यवाद
कृपया आपला अनुभव शेअर करा

Leave a Comment