क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन 50% मोठी घसरण Breaking news | Bitcoin Cryptocurrency news in marathi Russia Central bank

cryptocurrency news in marathi, bitcoin आणि इतर crypto coins 50 ते 80% पडले, why cryptocurrency is falling in marathi?,  या काही मुद्द्यांना आपण आज सविस्तर आणि खोलात जाऊन समजुन घेणार आहोत.

क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन 50% मोठी घसरण Breaking news | Bitcoin Cryptocurrency news in marathi Russia Central bank :

जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी Bitcoin हि आहे हे crypto जगातील सर्व लोकांना नक्कीच माहिती आहे. बिटकॉइनच्या price मध्ये मागच्या वर्षीच्या म्हणजेच 2021 च्या नोव्हेंबर महिन्यापासून जोरदार घसरण सुरू झाली होती.

2021 च्या नोव्हेंबर महिन्यात Bitcoin ची ट्रेडिंग ही 69,000 डॉलर म्हणजे जवळजवळ 51 लाख रुपये प्रति बिटकॉइन या भावावरती होत होती. तर सध्या Bitcoin चा भाव हा फक्त 35,700 रुपयांवर आला आहे. त्यावेळी फक्त बिटकॉईन या Cryptocurrency चे मार्केट cap हे 1200 अरब डॉलर इतके होते.

मागील तीन महिन्यात Bitcoin मध्ये 50 टक्क्यांची घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. म्हणजेच Bitcoin या क्रिप्टोकरन्सीचे मार्केट कॅप हे 600 अरब डॉलरने खाली पडून आता 600 अरब डॉलरवर आले आहे. (cryptocurrency news in marathi)

1. सर्व Cryptocurrency coins मध्ये घसरण :

फक्त Bitcoin च नाही तर जगातील सर्वच Cryptocurrency मध्ये आतापर्यंतची मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. Cryptocurrency च्या इतिहासातील ही दुसरी सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.

1. Bitcoin : शनिवारी बिटकॉइनची price हि 7 टक्क्यांनी खाली पडून 34,042 डॉलरवर आलेली बघायला मिळाली.

2. Ethereum : म्हणजेच Ether या क्रिप्टोकरन्सीची price हि मागील 24 तासात 15 टक्क्यांनी खाली पडून 2353 डॉलरवर आली आहे. Ethereum हि Bitcoin नंतर दुसरी मोठी आणि प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी आहे.

3. Dogecoin : या प्रसिध्द crypto ची किंमत ही 0.13 डॉलरवर आली आहे. मिमकॉइन Dogecoin हा 2021 च्या मे महिन्यात 0.7 डॉलरवर ट्रेड करत होता. म्हणजेच मागील आठ महिन्यात या crypto मध्ये 80% एवढी मोठी घसरण झाली आहे.

4. Binance coin : cryptocurrency मधील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे कॉईन म्हणजे बाइनेंस कॉइन हे आहे. तर याची किंमत ही 9 टक्क्यांनी खाली पडून 349 डॉलरवर आली आहे.

5. Cardano : cardano या क्रिप्टो कॉइनची किंमत ही 8 टक्क्यांनी खाली पडून 1 डॉलरवर आली आहे.

तसेच coinmarket.com यांच्या मते 22 जानेवारीच्या दिवशी 24 तासात संपूर्ण क्रिप्टोची मार्केट कॅप ही जवळ जवळ 12 टक्क्यांनी कमी झाली आहे.

तसेच याच दिवशी क्रिप्टोकरन्सीमधील 100 पेक्षा जास्त Cryptocurrency tokens जोरदार पडलेले पाहायला मिळाले तर काही coins 30 टक्क्यांपेक्षा जास्त खाली आले आहेत.

Cryptocurrency Price In $ Price In Indian Rs
Bitcoin 34,937.1 26,00,034 रु
Ethereum 2,397.7 1,78,443 रु
Dogecoin 0.13 10.04 रु
Binance coin 362.95 27,010 रु
Cardano 1.06 78.6 रु

2. why क्रिप्टोकरन्सी & बिटकॉईन crashed?

क्रिप्टोकरन्सीच्या World मधील जवळजवळ सर्वच क्रीप्टो coins किंवा टोकन मागील 3 महिन्यात 50 ते 80 टक्क्यांपर्यंत खाली पडलेले पाहायला मिळत आहेत हे आपण वरती सविस्तर पाहिलेच आहे.

Cryptocurrency crash होण्यामागे दोन मुख्य कारणे सध्या चर्चेत आहेत त्याबद्दल आपण आता सविस्तर पाहणार आहोत. (cryptocurrency news in marathi)

1. रशियन central bank आणि Crypto :

Crypto जोरदार खाली पडण्याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे Russian सेंट्रल बँकने रशियन सरकारकडे मांडलेले proposal.

त्यामध्ये रशियन सेंट्रल बँकेने Cryptocurrency ban करण्याबद्दल, क्रिप्टो कॉइन्सची ट्रेडिंग बंद करण्याबद्दल तसेच आणखी नवीन crypto कॉइन्स किंवा tokens निर्माण करण्यावर बंदी घालावी याबद्दल proposal तसेच मोठा अहवाल जमा केला आहे.

रशियन सेंट्रल बँकेने आपल्या अहवालात Cryptocurrency मुळे काय काय धोके निर्माण होऊ शकतात याबद्दल सांगताना पुढील काही मुद्दे मांडले.

Crypto मुळे भविष्यात मोठी आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते, तसेच चलनासंबंधी मोठी अराजकता तसेच valuation आणि भविष्यात त्याच्या वापरासंबंधी मोठे संकट उभे राहु शकते, Cryptocurrency मुळे नागरिकांचा पैसा सुरक्षित नाहीये तसेच त्यांची आर्थिक सुक्षितता धोक्यात असल्याचे दिसत आहे. हे तीन मुद्दे त्यांनी विशेषतः आणि सविस्तर मांडले.

रशिया देश आतापर्यंतच्या इतिहासात नेहमीच Cryptocurrency, Bitcoin च्या विरोधातच असल्याचे पाहायला मिळाला आहे. परंतु रशियन सरकारने 2020 साली क्रिप्टोच्या ट्रेडिंग म्हणजेच खरेदी विक्रीला Legally परवानगी दिली होती परंतु crypto tokens चा उपयोग कोणत्याही प्रकारच्या payment साठी करता येणार नाही यावरती बंदी घातली होती.

2. फेडरल बँक आणि Crypto :

फेडरल बँकेने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे कि व्याजदरांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तसेच आणखी काही दिवसांनी त्यामध्ये आणखी वाढ बघायला मिळू शकते. हे एक दुसरे महत्वाचे कारण आहे ज्यामुळे cryptocurrecy coins आणि बिटकॉइन आपल्याला खाली येताना दिसत आहेत.

3. Cryptocurrency आणि रशिया :

तर तुम्ही म्हणाल क्रिप्टो Ban करण्याबद्दल तर चीन सरकारचीसुद्धा अशीच घटना इतिहासात घडली होती. त्यावेळेससुद्धा असाच मार्केट crash आला होता. परंतु त्यानंतर लगेचच मार्केटमध्ये recovery पाहायला मिळाली होती.

तसेच आपल्या भारतातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकार क्रिप्टो ban करण्याबद्दल विचार करत आहे तर मग रशियाच का एवढा महत्वाचा देश ठरला आहे Crypto crash च्यामागे..?

त्यामागे महत्वाचे कारण आहे ते म्हणजे रशिया हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त Cryptocurrency ची ट्रेडिंग करणारा देश आहे. तसेच crypto चे सर्वात जास्त उत्पादन किंवा निर्माण रशिया या देशातच झाला आहे. (cryptocurrency news in marathi)

त्यामुळे ज्या देशात क्रिप्टोची मोठी हिस्सेदारी आहे, जो देश क्रिप्टोच्या निर्मानाचा साक्षीदार आहे तोच देश आज crypto Ban करण्याबद्दल बोलत आहे. तर नक्कीच मोठा Cryptocurrency crash बघायला मिळणार आहे आणि तो सध्या दिसतही आहे.

—-   धन्यवाद  —-

शेअर बाजार बातम्या ह्या शेअर मार्केटमधील प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाच्या असतात हे नक्कीच शाश्वत सत्य आहे. जर तुम्हाला हि Cryptocurrency news in marathi News आणि माहिती आवडली तर नक्की संकेत द्या आणि comment करा… ज्याच्यामुळे आम्हाला नक्कीच Motivation मिळेल. 

धन्यवाद
कृपया आपला अनुभव शेअर करा

Leave a Comment